NEET - २०२५ परीक्षेत संजय घोडावत आय.आय.टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेचं घवघवीत यश

NEET - २०२५  परीक्षेत संजय घोडावत आय.आय.टी व मेडिकल अकॅडमीच्या उत्कर्षा हळींगळेचं घवघवीत यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) - NEET २०२५ परीक्षेत उत्कर्षा हळींगळे या विद्यार्थीनीने ७२० गुणांपैकी ६३३ गुण  मिळवून तसेच ऑल इंडिया रँक १९३ व कॅटेगरी रँक ४५ प्राप्त करून घवघवीत यश संपादन करून संपूर्ण देशात संजय घोडावत आय.आय.टी व मेडिकल अकॅडमीचे नाव उंचावले आहे. 

तसेच संस्थेच्या सृष्टी कदम  (६१५ गुण,ऑल इंडिया रँक ६२७), आदित्य फातले (६०६ गुण ,ऑल इंडिया रँक ९८६ )  ,श्रेया पवार  (६०५ गुण ,ऑल इंडिया रँक १०३१ ) , विकास चौधरी (६०० गुण ,ऑल इंडिया रँक १३६९) यांचा समावेश आहे. 

संस्थेच्या ०५ विद्यार्थ्यांनी ६०० तर १०७ विद्यार्थ्यांनी ५०० च्या वरती गुण  मिळवून उच्चत्तम निकालाची परंपरा कायम राखली आहे .  

या यशाबद्दल बोलताना संस्थेचे संचालक वासु म्हणाले की, “दूरदृष्टी  आणि दृढनिश्चय हि यशाची गुरुकिल्ली आहे”. संस्थेचे चेअरमन संजय घोडावत व विश्वस्त  विनायक भोसले यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.