ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा उत्साहात

ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा उत्साहात

कोल्हापूर (प्रतिनिधी) - ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ कोल्हापूरची पाचवी सर्वसाधारण सभा राजापूर येथील ‘सेलिंग मोंटू’ या रिसॉर्टमध्ये उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी बळीराम वराडे हे होते.

अध्यक्षीय भाषणात वराडे यांनी मागील पाच वर्षांचा प्रगती अहवाल मांडून असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. जिल्ह्यातील महत्त्वाच्या कमिट्यांमध्ये प्रतिनिधित्व वाढवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांची सलग दुसऱ्यांदा पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून निवड झाली. 

सचिव रवींद्र पोतदार यांनी सर्वांचे स्वागत करत मागील वर्षीच्या सभेचा वृत्तांत दिला. खजिनदार संजय गांधी यांनी आर्थिक हिशोब सादर करून आगामी वर्षाचे अंदाजपत्रक मांडले. जॉईंट सेक्रेटरी इम्रान मुल्ला यांनी सभेचा समारोप करत सर्वांचे आभार मानले.

उपाध्यक्ष विनोद कंबोज यांनी संघटनेच्या प्रगतीबाबत आणि वेबसाईटच्या विकासाबाबत माहिती दिली. तसेच संचालक अमित चौगुले यांनी डीएमसी बैठकीचा आढावा घेतला.

या कार्यक्रमात 55 सभासद सहभागी होते. नवीन व जुने सभासद एकत्र येत टुरिझम क्षेत्रातील माहितीची देवाणघेवाण झाली. ‘सेलिंग मोंटू’ रिसॉर्टने सभेसाठी विनामूल्य भोजन व निवास सुविधा दिल्याबद्दल विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी संचालक सचिन सावंत, अमित चौगुले, सतीश दळवी, नवनाथ सुर्वे यांच्यासह आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.