राज्यस्तरीय "जिजाऊ रथयात्रेचे " 21 मार्चला कोल्हापूरात आगमन

कोल्हापूर : राज्यस्तरीय "जिजाऊ रथयात्रेचे" 21 मार्च 2025 रोजी कोल्हापुरात आगमन होणार आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून "समाज जोडो अभियान" राबविण्यात येणार असल्याची माहिती मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष (सातारा, कोल्हापूर ) इंजि. अश्विनकुमार पुंडलिक वागळे, मराठा सेवा संघ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष महिपती श्रीपती बाबर, राज्य संघटक व विभागीय अध्यक्ष औद्योगिक कक्षचे संजय शिवाजीराव काटकर यांनी दिली.
जिजाऊ रथ यात्रा' म्हणजे प्रबोधनाचा महाजागर
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात समता, समानता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकांना एकतेच्या सूत्रात जोडण्यासाठी सर्वांनी जिजाऊ रथयात्रेमध्ये सहभागी होऊन समतेचं,रयतेचं, स्वराज्य निर्माण करुया.
सध्या महाराष्ट्र आणि देशातील वातावरण जातीच्या आणि धर्माच्या नावाने विषारी आणि विखारी करण्याचे जोरदार कारस्थान सुरू आहे.माणसे एकमेकांपासून तोडली जात असून संत-महापुरुषांच्या पवित्र महाराष्ट्र भूमीला बदनाम करण्याचे षडयंत्र काही मंडळी करीत आहे.अशा या भीषण परिस्थितीत महाराष्ट्राची पूर्वीची ओळख निर्माण करण्यासाठी या 45 दिवसांमध्ये रथयात्रेच्या माध्यमातून परिवर्तनरुपी प्रबोधनाचा झंझावात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजणार आहे.
रथयात्रा आगमन ते समारोप मार्ग
दि. 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 4 ते 9 वाजता आगमन.... मार्ग भगवा चौक, कसबा बावडा, कावळा नाका, सायबर चौक, राजारामपुरी, जनता बाजार चौक, बागल चौक, उमा टॉकीज चौक, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, दसरा चौक येथे समारोप.
दि. 22 मार्च 2025 रोजी निर्गमन स. 9.30 ते दु. 3 वा. मार्ग उंचगाव, गडमुडशिंगी, वसगडे, पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, रांगोळी, शिरदवाड, अ. लाट, हेरवाड, कुरुंदवाड, नरसोबावाडी, शिरोळ, समारोप - जयसिंगपूर.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष इंजि. क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर असून प्रमुख पाहुणे म्हणून छावा मराठा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर, संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष अँड. मनोज आखरे, ज्येष्ठ मार्गदर्शक मराठा सेवा संघाचे विंगकमांडर टी आर जाधव, मराठा महासंघाचे वीरेंद्र शशिकांत पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष दिलीप जगताप, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष शिवमती सीमाताई बोके, जिजाऊ रथयात्रा प्रमुख सौरभ खेडेकर, मराठा सेवा संघ अध्यक्ष इंजि. विजय घोगरे, महासचिव महाराष्ट्र इंजि.चंद्रशेखर शिखरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रा. अर्जुनराव तनपुरे, प्रदेशाध्यक्ष मराठा उद्योजक कक्ष राजेंद्रसिंह पाटील उपस्थित राहणार आहेत.
तरी या रथयात्रेसाठी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष प्रवीण पाटील, महानगर अध्यक्ष राहुल इंगवले, संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष निलेश चव्हाण व मराठा सेवा संघ जिल्हा कार्यकारणीतर्फे करण्यात आले आहे.