रविवारी गोकुळच्या विविध बक्षीस वितरण समारंभासह सायलेज बेलर, हार्वेस्टर मशीनरीचा शुभारंभ

कोल्हापूर: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोकुळच्या वतीने विविध बक्षीस वितरण तसेच सायलेज बेलर व हार्वेस्टर मशीनरीचे अनावरण , गोकुळ पेट्रोल पंपाचा शुभारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गोकुळच्या वतीने देण्यात आली आहे.
या विविध बक्षिस वितरण समारंभ आणि सायलेज बेलर व हार्वेस्टर मशनरी शुभारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील असणार आहेत. तर या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच गोकुळ पेट्रोल पंपाचे उद्घाटन आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते होणार असून खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या संयुक्त कार्यक्रमाला राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार धैर्यशील माने,आमदार विनय कोरे, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार शिवाजी पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार राजीव आवळे,आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार संजय घाटगे,ए. वाय.पाटील, माजी आमदार संध्यादेवी कुपेकर, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे,कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांच्यासह संचालक उपस्थित राहणार आहेत.