चक्क ..! सायबर चोरट्याने केले 'त्या' मुलीचे कौतुक ..!

चक्क ..! सायबर चोरट्याने केले   'त्या' मुलीचे कौतुक ..!

नवी दिल्ली - सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूप वाढले आहे. सायबर गुन्हे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. अनेकजण ओळख निर्माण करून संगणक, स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर करून सहजरित्या सर्वसामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर, बऱ्याचदा तुमचं आलेलं पार्सल अडकलं आहे, तुमच्या मोबाईलवर चुकून पैसे पाठवले आहेत अशाप्रकारे लोकांची दिशाभूल केली जाते. मात्र, अशाच एका सायबर चोरट्याला एका मुलीने चांगलीच अद्दल घडवली असल्याची घटना सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमधून समोर आली आहे. 

https://x.com/gharkekalesh/status/1911410835118838014

व्हायरल व्हिडियोत एक मुलगी फोनवर बोलत असलेली दिसत आहे. संशयित व्यक्ती तिला तिच्या वडिलांचा मित्र आहे अशी ओळख पटवत तुझ्या वडिलांनी मला तुझ्या अकाउंट मध्ये यूपीआयने १२ हजार पाठवायला सांगितले. सुरुवातीला त्या व्यक्तीने १० हजार पाठवले तेव्हा त्या मुलीला एसएमएस  आलेला असतो. मात्र, तो कोणत्या बँकेच्या अकाउंटवरून न येता एका पर्सनल नंबरवरून आलेला असतो. समोरचा व्यक्ती आपल्याला फसवतो आहे हे त्या मुलीच्या लक्षात येतं. त्यावेळी राहिलेले २ हजार पाठवण्यासाठी पुन्हा तो व्यक्ती पर्सनल नंबरवरून पाठवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, नव्या एसएमएसमध्ये 2,000 ऐवजी 20,000 रुपये लिहिलेले असते. त्यावर तो चुकून जास्तीचे पैसे गेल्याचं सांगतो आणि तिला 12,000 रुपये स्वतःजवळ ठेवून उर्वरित 18,000 रुपये परत पाठवायला सांगतो. 

त्यावेळी ती मुलगी त्याचा आलेला एसएमएस कॉपी करून तो एडिट करते आणि त्यात १८ हजार हि किंमत टाकून पाठवले आहेत असे सांगते तेव्हा त्या चोरट्याच्या  लक्षात येते आणि तो तिला म्हणतो, मी तुला मानले बेटा एवढं बोलून फोन कट करतो. यामुलीच्या सतर्कतेमुळे या मुलीची सोशल मीडियावर सर्वजण स्तुती करत आहेत.