छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ; शाहूपुरी जिमखाना संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

छत्रपती राजाराम महाराज ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा ; शाहूपुरी जिमखाना संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश

कोल्हापूर : छत्रपती राजाराम चषक टी-२० स्पर्धेमधील आज उपांत्यपूर्व सामना शाहुपुरी मैदानावर झाला. शाहुपुरी जिमखाना विरुद्ध फायटर्स स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान होता. शाहुपुरी जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.

शाहुपुरी जिमखाना या संघाने निर्धारित 20 षटकांमध्ये 8 बाद 176 धावा केल्या .त्यामध्ये अमर त्रिपाठी याने 46 चेंडूमध्ये 75 धावा केल्या.फायटर्स स्पोर्ट्स संघाकडून गोलंदाजी करताना आकाश गाडेकर याने 4 बळी मिळवले. उत्तरादाखल खेळताना फायटर्स स्पोर्ट्स या संघाने 18.2 षटकात 10 बाद 146 धावा केल्या. यामध्ये अनुराग मेस्त्री याने 26 चेंडूत 37 धावा केल्या. शाहुपुरी जिमखाना संघाकडून दिवाकर पाटील याने 4 बळी मिळवले. 

शाहुपुरी जिमखाना संघाने हा सामना 30 धावांनी जिंकला. सामनावीर पुरस्कार अमर त्रिपाठी याला देण्यात आला.