रा. शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेतर्फे पारितोषिक वितरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : संस्काराची पहिली शाळा ही कुटूंब आहे. त्यामुळे मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुसंस्कार महत्त्वाचे आहेत, असे प्रतिपादन डॉ. संजय कळमकर यांनी केले. राजर्षी शाहू गव्हर्मेंट सव्र्व्हटस् बँकेच्या वतीने मुलींसाठी आयोजित पद्माराजे पारितोषिक वितरण व सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने होते. यावेळी कार्यकारी अभियंता डी. डी.शिंदे उपस्थित होते. शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम झाला.
बँकेचे अध्यक्ष मधुकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. संचालक रवींद्र येथे पंदारे, शशिकांत तिवले, अतुल जाधव, रोहित बांदिवडेकर, विलास कुरणे, रमेश घाटगे, सदानंद घाटगे, अजित पाटील, संजय खोत, किशोर पोवार, हेमा पाटील, मनुजा रेणके, प्रकाश पाटील, तज्ज्ञ संचालक दीपक पाटील, गणपत भालकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांसह सभासद उपस्थित होते. उपाध्यक्ष अरविंद आयरे यांनी आभार मानले.