जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रशिक्षण संपन्न

जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसाठी भारतीय मानक ब्युरोचे प्रशिक्षण संपन्न

कोल्हापूर (प्रतिनिधी) - भारतीय मानक ब्युरो (BIS) मानकांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षणात संशोधक शास्त्रज्ञ तथा सहसंचालक ज्ञान प्रकाश यांनी माहिती दिली. 

गुणवत्ता नियंत्रणात जागरूकता वाढविण्यासाठी प्रशिक्षणामध्ये आयएसओ प्रमाणपत्र, आयएसआय मार्क, ग्राहक संरक्षण, प्रयोगशाळा चाचण्या, तसेच बीआयएसच्या नवीन डिजिटल उपक्रमांबाबत अधिकृत बीआयएस वेबसाइटवर तसेच भारतीय मानक ब्युरो (BIS CARE APP) या मोबाईल ॲपवर माहिती देण्यात आली आहे. या प्रशिक्षणात जिल्ह्यातील विविध विभागाचे शासकीय अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

भारतीय मानक ब्युरो (BIS) ही राष्ट्रीय मानक संस्था आहे. जी 2016 च्या कायद्यांतर्गत अर्थव्यवस्थेचा विविध क्षेत्रांना व्यापणारी उत्पादने प्रक्रिया आणि सेवांसाठी भारतीय मानके तयार करण्यासाठी नियुक्ती केली गेली आहे. देशभरात विविध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करते, ज्यामध्ये मार्गदर्शक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम तसेच नवीन परवाना धारकांसाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले जाते. 

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, नायब तहसीलदार नितीन धापसे पाटील, तहसीलदार विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.