०६ जुलै रोजी मोहरम ताबूत विसर्जन मिरवणूक वाहतूक व्यवस्था 'या' प्रमाणे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्हापूर शहरामध्ये ०६ जुलै रोजी मोहरम ताबूत विसर्जन मिरवणूक आहेत. या मिरवणूका सुरळीत व सुरक्षित पार पाडणे करीता तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरीता शहरातील वाहतुक सुरळीत व सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. त्याकरीता पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये कोल्हापूर शहरामध्ये रहदारी नियमना करीता ताबुत विसर्जन मिरवणूक मार्गास मिळणारे खालील नमूद मार्ग मोटार वाहनांना वाहतुकीस बंद व वळविणे बाबत पोलीस अधीक्षक यांनी निर्देश जारी केलेले आहेत.
वाहतूक व्यवस्था पुढीलप्रमाणे -
अ) ताबूत विसर्जन मार्ग :-
बिंदू चौक ते शिवाजी रोड ते छ. शिवाजी महाराज पुतळा ते माळकर चौक ते पान लाईन ते पापाची तिकटी ते गंगावेश ते पंचगंगा घाट
वर नमुद मार्गावर दुचाकी व हलकी चारचाकी वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.
ब) प्रवेश बंद व वळविण्यात आलेले मार्ग खालीलप्रमाणे :-
०१) गगनबावडा मार्गे कोल्हापूर शहरात येणा-या सर्व अजवड वाहनांना फुलेवाडी नाका येथे प्रवेश बंद करणेत येत असुन ती वाहने फुलेवाडी नाका ते फुलेवाडी रिंगरोड ते आपटेनगर ते नवीन वाशी नाका ते कळंबा साई मंदिर ते संभाजीनगर मार्गे ये-जा करतील.
०२) रत्नागिरी कडून कोल्हापूर शहराकडे येणाऱ्या अवजड वाहनांना वडणगे फाटा येथे प्रवेश बंद करण्यात येत असुन सदरची वाहने वडणगे, भुये, शिये मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
०३) शिवाजी पुल मार्गे शहरात येणाऱ्या एस.टी.व के.एम.टी. बसेस गायकवाड बंगला ते आखरी रस्ता ते गंगावेश मार्गे न जाता शिवाजी पुल ते तोरस्कर चौक ते सी.पी.आर. चौक मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
०४) सी.बी.एस.स्टैंड कडून रत्नागिरीकडे जाणाऱ्या सर्व एस.टी. बसेस या ताराराणी पुतळा ते धैर्यप्रसाद हॉल ते मा. जिल्हाधिकारी साो कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंप ते शिवाजी पुल मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
०५) सी.बी.एस.स्टैंड कडून गारगोटी, राधानगरी, गगनबावडयाकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस या ताराराणी पुतळा ते कोयास्को चौक ते हायवे कॅन्टीन चौक ते सायबर चौक ते रिंगरोड मार्गे पुढे मार्गस्थ होतील.
०६) बिंदु चौक ते छ. शिवाजी महाराज चौक ते पापाची तिकटी ते गंगावेश ते आखरी रस्ता मार्गे जाणा-या के.एम.टी व एस.टी. बसेस ना बिंदु चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत असुन सदर बसेसनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
०७) रंकाळा स्टॅन्ड ते गंगावेश ते पापाची तिकटी ते माळकर सिग्नल चौक मार्गे धावणा-या सर्व केएमटी व एस.टी बसेसना या मार्गावर प्रवेश बंद करण्यात येत असुन सदर बसेसनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.
वरील सर्व मार्ग हे ०६ जुलै रोजी दुपारी १२.०० वाजले पासून ताबूत विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना आवश्यकतेनुसार प्रवेश बंद व वळविणेत येत आहे.