HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

जिल्ह्यात 14 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 14 ऑगस्टपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, ऊरुस, सण इ. साजरे होणार असून विविध पक्ष, संघटनांकडून विविध मागण्यांसाठी आंदोलन, उपोषण, मोर्चा, इत्यादी प्रकारचे आंदोलन करण्यात येते. या कालावधीत  कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी  जिल्ह्यात दिनांक 31 जुलै  रोजी सकाळी 6 ते दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत  महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये बंदी आदेश जारी करण्यात येत असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी संजय तेली यांनी कळविले आहे.

   हा आदेश ज्या सरकारी अधिकारी, कर्मचारी यांना त्यांची कर्तव्य, अधिकार बजाविणे संदर्भात कामकाज करताना उपर्निर्दिष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक, कोल्हापूर अगर संबंधित  उपविभागीय पोलीस अधिकारी अगर संबंधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे, अशा व्यक्तींना तसेच सर्व जातीधर्माचे सण/उत्सव/जयंती/यात्रा इ. हे शांततामय मार्गाने साजरे करण्याकरीता जमा होणारा जनसमुदाय यांना व लग्न, इतर धार्मिक समारंभ, सण, यात्रा, प्रेतयात्रा इत्यादी यांना लागू असणार नाही. तसेच जिल्ह्यात सध्या महापुरामुळे सुरु असलेले मदत व पुनर्वसन कामी नेमलेले अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक यांना लागू असणार नाही.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.