कराड येथे मोफत रोटरी दिव्यांग महाशिबीर संपन्न

कराड येथे  मोफत रोटरी दिव्यांग महाशिबीर संपन्न

कराड (प्रतिनिधी)  :  रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉक्टर सुरेश साबू व माजी गव्हर्नर रो .स्वाती हेअर हेरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली रत्न निधी फाउंडेशन मुंबई व रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी अत्याधुनिक कृत्रिम मोडेलर पाय हात जयपूर फूट मोजमाप घेण्याचे शिबिर कराड येथे संपन्न झाले.  या शिबिरासाठी रोटरी क्लब ऑफ मलकापूरचे प्रोजेक्ट कॉर्डिनेटर रो. सलीम मुजावर, क्लबचे अध्यक्ष रो. चंद्रशेखर दोडमणी, सचिव रो. विकास थोरात, प्रोजेक्ट डायरेक्टर रो डॉ. संतोष जाधव, समन्वयक रो. विलासराव पवार, रो. संजय बडदरे यांचे मार्गदर्शन लाभले. 

या शिबीराचा लाभ घेण्यासाठी नागपूर जालना सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातून लाभार्थी आले होते. या दिव्यांग बांधवाना व त्यांच्या नातेवाईकांना चहा व अल्पोपहार ची व्यवस्था तीनही क्लबच्या वतीने करण्यात आली होती. हे शिबीर दोन दिवस सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत संपन्न झाले. या शिबीरामध्ये एकूण २५८ लाभार्थींनी ज्यांना हात नाही पाय नाही अशांनी मापे दिली. रोटरी क्लब ऑफ मलकापूर कराड पाटण च्या रोटरी सदस्यांनी सेवा पुरविण्याचे काम केले . त्यामध्ये प्रामुख्याने शिबीरामध्ये हजर असलेल्या दिव्यांगाचे रजिस्ट्रेशन करणे, अल्पोपहार देणे ज्या दिव्यांगांना चालता येत नाही अशांना उचलून डॉक्टरांपर्यंत नेणे अशा सेवा पुरविल्या. या शिबीराचा ज्यांनी लाभ घेतला त्यांनी समाधान व्यक्त केले.

या शिबीरामध्ये दोन दिवस आपला अमुल्य असा वेळ देऊन शिबीरासाठी  रो. सुनिल बसुगडे, रो. विजय मोहिर, रो. भगवानराव मुळीक, रो. शुभांगी शेलार, रो. आनंदराव बागल, रो. राहूल जामदार (खजिनदार ), रो. तेजस सोनवले, रो विनोद सावंत, रो. दिलीपराव संकपाळ, रो. संदीप पाटील, रो . विनोद आमले, रो. विनोद सावंत, रो. डॉ. सतिश संकपाळ, रो. विजय दुर्गावळे, रो. राजन येळापूरे, रो. विजय चव्हाण (चार्टर्ड प्रेसीडेंट ) ,रो. अमोल सुतार, रो . शिवाजीराव पाचुपते, रो. नंदकुमार गायकवाड सहकार्य केले.  या शिबीरास PDG रो स्वाती हेरकळ फ्रॉन्सचे रोटरीयन तसेच वाई क्लबचे अध्यक्ष डॉ. दातार, पत्रकार विजया माने, शिक्षणमहर्षी बापूजी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सतिश घाटगे, दिव्यांग बांधवांना मदत करणारे विजय पाटील इत्यांदी मान्यवरांनी भेटी दिल्या.  हे शिबीर यशस्वी करण्यासाठी तिन्ही क्लबचे अध्यक्ष सेक्रेटरी समन्वयक व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्टच्या मान्यवरांचे खूप सहकार्य लाभले. यावेळी असिस्टंट गवर्नर रो. गजानन माने यांनी सर्व क्लबच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. शिबीरामध्ये जे लाभार्थी आले होते त्यांनी देखील तीनही क्लबचे आभार मानले