महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पृथ्वी गायकवाड
कोल्हापूर (प्रतिनिधि): वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघ कर्नाटकातील बेळगांव येथे सुरू असलेल्या ज्युनियर गर्ल्स नॅशनल फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये सहभागी झाला आहे. कोल्हापूरची ए.एफ.सी." सी " लायसन्स महिला प्रशिक्षक पृथ्वी लालासाहेब गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य ज्युनियर गर्ल्स फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या प्रशिक्षकास राष्ट्रीय स्तरावर मुख्य प्रशिक्षकपदी कामकाज करून ठसा उमटविण्याची मोलाची संधी उपलब्ध झालेली आहे.
यापूर्वी सन २०२२ मध्ये गुजरात येथे झालेल्या नॅशनल गेम्समध्ये सहभागी महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघाच्या व्यवस्थापकपदी तसेच पंजाब येथे झालेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत सहभागी महाराष्ट्र संघाच्या व्यवस्थापकपदी कोल्हापूरच्या पृथ्वी गायकवाड यांनी उत्तमरितीने कामकाज पाहिलेले आहे.
पृथ्वी गायकवाड यांना संस्थेचे पेटून-इन्-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज, पेट्रन् मेंबर संभाजीराजे छत्रपती, ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे कार्यकारिणी सदस्य, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष शमालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व वे.ई.फु.असो., महिला समिती चेअरमन मधुरिमाराजे छत्रपती यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. तर ऑन जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, जॉ. सेक्रेटरी प्रा. अमर सासने, फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी यांचे सहकार्य लाभले.