HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या एमबीए ॲग्रीच्या २६ विद्यार्थ्यांची निवड

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या एमबीए ॲग्रीच्या २६ विद्यार्थ्यांची निवड

कोल्हापूर प्रतिनिधी : डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटच्या २६ विद्यार्थ्यांची कृषी व संलग्नित विविध कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना 4.२५ लाख रुपयांपर्यंत वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

विद्यापीठाच्या सुहास आघाव, योगेश्वरी अखंड, अनिकेत भरगुडे व मसूद रिझवान यांची झायडेक्स कंपनीमध्ये निवड झाली असून त्यांना वार्षिक ४.२५ लाख पॅकेजवर मिळाले आहे. सिद्धांत साळुंखे, सौरभ पाटील, ओंकार जाधव, पृथ्वीराज माने, विवेक ब्याले यांची महाधन फर्टीलायझर कंपनीमध्ये ४.२५ लाख वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. शुभम देवरे, हरिश्चंद्र खोत व प्रशांत चव्हाण यांची इंडिया मार्ट कंपनीमध्ये (४ लाख) संकेत क्षीरसागर व किरण मोहिते ग्रोइट या कंपनीमध्ये (३.६ लाख), प्रज्ञा भोयर हिची पराग मिल्क व बेवरेजेस प्रा. लि. कंपनीमध्ये (४ लाख), अभिजीत काटकर याची मोजॅक इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये (३.२५ लाख), गिरीश पाटील याची वलाग्रो बायोसायन्स प्रा. लि. कंपनीमध्ये (३.२ लाख), श्रेयस मालोंडकर याची सातारा मेगा फूड पार्क येथे (३ लाख), शेजल कानोजे हीची सर्च बॉर्न कन्सल्टिंग प्रा. लि. कंपनीमध्ये (३ लाख), आदित्य शेंडगे, रुपेश गायकवाड याची ऑलिगो हरिजन प्रा. लि. या कंपनीमध्ये (२.६ लाख), रितवीजा पाटील, शुभम नागरे, अमर खर्डे, राजवर्धन पाटील व अनिकेत पाटील यांची ॲग्रोसन अलायनसेस प्रा.लि. कंपनीमध्ये (२.४ लाख), निवड झाली आहे. 

या निवडीबद्दल कुलपती डॉ.संजय पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत, सहयोगी अधिष्ठाता डॉ. शुभांगी जगताप, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वयक प्रा. स्वराज पाटील, प्रा. प्रदीप पाटील, सहयोगी अधिष्ठाता ॲकेडेमिक्स डॉ. अनिल गायकवाड, प्रक्षेत्र प्रमुख इंजिनिअर अमोल गाताडे, डॉ. रणजीत पाटील, डॉ. शत्रुघ्न भुसनर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.