ठाकरे युवासेनेचे विविध मागण्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

ठाकरे युवासेनेचे विविध मागण्यांसाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना निवेदन

कोल्हापूर : बेरोजगार विध्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कॉलेज व विध्यापिठामध्ये दर सहा महिन्याला रोजगार मेळावे सुरू करावेत, प्राध्यापक भरती मध्ये बनावट जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर आजीवन भरती पासून बंदी घालावी व वर्षातून एकदा कॉलेज विध्यार्थ्यांना मोफत शासनातर्फे एक दिवसीय गडकिल्ल्यांची सहल द्यावी या मागण्यांचे निवेदन  राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांना ठाकरे  युवासेनेच्या वतीने देण्यात आले. 

निवेदनात म्हटले आहे की. राज्यासह देशांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येत आहे, पण सध्या तरुणां समोर रोजगाराचा मोठा प्रश्न उपस्थित राहत आहे. पदवी, पदव्युत्तर, पदवी, पीएचडी सारखे उच्च शिक्षण घेतलेल्या हजारो तरुणांना आज आपल्या राज्यामध्ये नोकरी पासून उपेक्षित राहायला लागत आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री या नात्याने आपण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये तेथील शासकीय कॉलेज असो किंवा ज्या जिल्ह्यात विद्यापीठ आहेत.  येथे दर सहा महिन्याला तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे, तसेच महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती सुरू आहे अनेक प्राध्यापकांनी नोकरी मिळवण्यासाठी विविध प्रवर्गातील नकली जातींचे दाखले काढले आहेत.  यामुळे अनेक पात्र व विशिष्ट प्रवर्गातील पात्र उमेदवारांवर अन्याय होत आहे.  त्यामुळे अशा उमेदवारांवर कडक शासन होणे गरजेचे आहे. जेणेकरून पात्र उमेदवारांवर अन्याय होणार नाहीत. 

निवेदनात पुढे म्हटले आहे की, ज्या उमेदवारांनी विविध महाविद्यालयात भरती प्रक्रियेसाठी विविध जात प्रमाणपत्र सादर केले आहेत. त्यांवर आजीवन भरती न होण्यासाठी बंदी घालावी व शासनाची फसवणूक केली म्हणून अशा उमेदवारांवर  गुन्हा नोंद करावा. याबरोबर उच्च शिक्षण विभागाने प्रत्येक शासकीय कॉलेज च्या विध्यार्थ्यांना वर्षातून एकदा एक किल्ल्याचे दर्शन मोफत घडवून आणावे, कारण सर्वच विध्यार्थी वर्गाची आर्थिक परिस्थिती असते असं नाही,जेणेकरून गोरगरीब विध्यार्थी देखील छत्रपती शिवरायांचे विचार महाविद्यालयीन वयातच आचरणात आणतील.  

या निवेदनातील सर्व मागण्यांवर विचार करू तसेच जे शासनाला फसवतात त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन यावेळी मंत्री पाटील यांनी दिले. 

यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख मंजित माने, जिल्हा चिटणीस चैतन्य देशपांडे, उपजिल्हा युवाअधिकारी बंडा लोंढे, सदाशिव पवार, महानगर प्रमुख सनराज शिंदे, शहर युवा अधिकारी सुमित मेळवंकी, शहर समन्व्यक अक्षय घाटगे आदी उपस्थित होते.