डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या अनिकेत मानेची सिस्को कंपनीमध्ये निवड
कसबा बावडा (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग शाखेचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी अनिकेत माने याची "सिस्को" या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये "टेक्निकल कन्सल्टिंग इंजिनिअर" पदावर इंटर्नशिप व प्री-प्लेसमेट जॉब ऑफर साठी निवड झाली आहे. इंटर्नशिपमध्ये त्याला प्रतीमहा ९८ हजार विद्यावेतन मिळणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. अनिलकुमार गुप्ता म्हणाले, ‘सिस्को’च्या प्लेसमेंटसाठी देशभरातून २५ हजारहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये ६ फेऱ्यांमधून आणि विविध कठीण चाचण्यांमधून अनिकेत माने याने हे यश संपादन केले आहे. अनिकेतचे हे यश संस्थेसाठी अभिमानास्पद आहे. महाविद्यालयात पहिल्या वर्षीपासून देण्यात येणारी विविध सॉफ्ट स्कील ट्रेनिंग, ऑनलाईन ट्रेनिंग, मॉक इंटरव्ह्यू याचाही त्याचा चांगला फायदा झाला. अनिकेत व त्याचे वडील सुधाकर माने व आई रुपाली माने यांचेही विशेष अभिनंदन.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष माननीय आ. सतेज डी. पाटील, विश्वस्त आ.ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डिन सीडीसीआर प्रा. सुदर्शन सुतार, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. मकरंद काईंगडे, विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, सिस्को इंटर्नशिप समन्वयक प्रा. निरज हावळ, डॉ. किर्ती महाजन व स्नेहल केरकर यांचे बहुमोल सहकार्य लाभले.