HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचा वर्ल्ड ट्रेड सेंटरशी सामंजस्य करार

मुंबई - डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे व वर्ल्ड ट्रेड सेंटर, मुंबई यांच्यात नुकताच सामंजस्य करार संपन्न झाला. या करारामुळे दोन्ही संस्थांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर संशोधन करण्यासाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. 

या करारांतर्गत आंतरराष्ट्रीय व्यापार, सप्लाय चेन मॅनेजमेंट, आयात, निर्यात वरती आधारित विविध पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. 

वर्ल्ड ट्रेड सेंटर हे एक प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे जो धोरणकर्ते, जागतिक व्यावसायिक आणि विकास संस्थांना एकत्र आणण्याचे कार्य करते. वर्ल्ड ट्रेड इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना जोडण्याचे कार्य करते तसेच विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोन आणि औद्योगिक भविष्यासाठी व्यावहारिक कौशल्ये प्रदान करते.

डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले, "जागतिक बाजारपेठेच्या गरजांशी शैक्षणिक क्षेत्राची पूर्तता करण्याच्या दिशेने आम्ही महत्वाचे पाऊल टाकले आहे. व्यापार शिक्षण, उद्योजकता आणि औद्योगिक करिअरमध्ये उद्योग-संबंधित कार्यक्रम सुरू करण्यासाठी वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि डी.वाय.पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात सामंजस्य करार करण्यात आला आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबईने आयोजित केलेल्या आगामी जागतिक आर्थिक शिखर परिषदेत शाश्वत शेतीमध्ये कृषी-तंत्रज्ञान आणि नवोपक्रम हे विषय एकत्रित करण्यावर यावेळी चर्चा झाली. 

कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व डॉ. जे. ए. खोत यांचे सहकार्य लाभले. 

यावेळी डी.वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. के. प्रथापन, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका आकृती बागवे, प्रिया पानसरे, संतोष कोत्रे व तृप्ती चक्रवर्ती आदी मान्यवर उपस्थित होते. 

 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.