डीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास प्रारंभ
इचलकरंजी (प्रतिनिधी) : अभियांत्रिकी प्रवेशासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची प्रक्रिया १४ जुलै पासून सुरु झालेली आहे. डीकेटीई हे अभियांत्रिकी प्रवेशाचे स्कृटनी सेंटर आहे. अभियांत्रिकी प्रवेशासाठी अवश्यक असणा-या सर्व सेवांची सोय डीकेटीई मध्ये उपलब्ध आहे.
डीकेटीईच्या लायब्ररी मध्ये सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यासाठी मोफत तज्ञ प्राध्यपकांद्वारे मार्गदर्शन देण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. पहिल्याच दिवशी पालक व विद्यार्थ्यानी उत्साहात या सुविधेचा लाभ घेतला आहे. प्रथम वर्ष इंजिनिअरींग प्रवेशाबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची शेवटची मुदत दिनांक २४ जुलै पर्यंत आहे तसेच १५ ते २५ जुलै २०२४ या कालावधीत डाक्युमेंट व्हेरिफिकिशेन देखील करुन घेण्याचे आहे.
इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण प्रवेश प्रक्रियेवेळी अत्यावश्यक काळजी घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी करिअरच्या या महत्वाच्या टप्प्यावर प्रवेश प्रक्रियेदरम्यान होणा-या चुका व गैरसमजुती टाळाव्यात तसेच चालू वर्षीच्या प्रवेश प्रक्रियेतील वेगळेपणा या मुददयांची सखोल माहीती घेवून आपल्या करिअरचा मार्ग सुखकर करावा.
इंजिनिअरींग प्रवेश प्रक्रियेचा लाभ इंजिनिअरींग इच्छुक विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन डीकेटीई संस्थेच्या प्र. संचालिका प्रा.डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, डेप्युटी डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे.पाटील यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रियेच्या माहितीसाठी प्रवेश प्रक्रियेचे इनचार्ज प्रा. डॉ. ए. के. घाटगे ७०८३२५३६७२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.