डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सर्वधर्मीय जयंती समिती तर्फे उत्साहात साजरी अंध दाम्पत्याच्या उपस्थितीत अभिवादन

डॉ.बाबासाहेब आंबेडकर  जयंती सर्वधर्मीय जयंती समिती तर्फे उत्साहात साजरी  अंध दाम्पत्याच्या उपस्थितीत अभिवादन

कोल्हापूर प्रतिनिधी मुबारक आत्तार

कोल्हापूर, दि.१४ (प्रतिनिधी) सर्वधर्मीय जयंती समितीतर्फे बिंदू चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास करवीर चे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी,धर्मदाय उपायुक्त शिवराज नायकवडे, पुलाची शिरोली येथील अंध पती-पत्नी आशा जयपाल कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक,जुना राजवाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश गुरव, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता डाॅ.प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. गिरीश कांबळे यांच्या हस्ते उपस्थितांना भोजनवाटप करण्यात आले, 

यावेळी लहुजी साळवे प्रतिष्ठानचे शहराध्यक्ष राहूल गणेशार्चाय,जि. प. चे कक्ष अधिकारी संजय अवघडे, एम.आय.डी.सी. चे अभियंता इराप्पा नाईक, सर्वधर्मीय जयंती समितीचे कार्याध्यक्ष गजानन कुरणे,अॅड.दत्ताजीराव कवाळे, अमोल कुरणे,अक्षय साळवे,प्रा

.आनंद भोजने,जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब साळवी,अॅड.सरदार किरवेकर, डाॅ.प्राजक्ता सूर्यवंशी, निवास सूर्यवंशी,अॅड.राहूल सडोलीकर आदी उपस्थित होते.