डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ मार्फत अभिवादन;गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

डॉ.वर्गीस कुरियन यांना गोकुळ मार्फत अभिवादन;गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राष्‍ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्यावतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्‍या मुंबई येथे झालेल्‍या दहशतवादी हल्‍यातील शहिदांना गोकुळ परिवाराकडून आदरांजली ही वाहण्‍यात आली.

          यावेळी बोलताना संघाचे संचालक प्रकाश पाटील म्‍हणाले की, श्वेतक्रांतीचे जनक डॉ. वर्गीस कुरियन यांची आज १०३ वी जयंती असून २०१४ पासून हा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो. गोकुळच्या जडणघडणीमध्ये डॉ.कुरियन यांचे मोलाचे मार्गदर्शन झाले असून त्यांच्या विचारानेच गोकुळची वाटचाल चालू असून त्यामुळेच गोकुळची आर्थिक परिस्थिती नेहमीच भक्कम राहिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली यशस्वीपणे राबविण्यात आलेल्या ऑपरेशन फ्लड योजनेमुळे आज भारत दुग्ध उत्पादनात जगात अग्रस्थानी आहे. त्यांनी सहकारी संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची भावना कायम ठेवली असे मनोगत यावेळी व्यक्त केले.

          यावेळी गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

          यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, अरविंद जोशी, रामकृष्ण पाटील, जगदीश पाटील, ए.एस.स्वामी, कैलास मोळक, एस.जी.अंगज, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, दत्तात्रय वागरे, डॉ.प्रकाश दळवी, संग्राम मगदूम, एम.पी.पाटील, डॉ.कडवेकर इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.