दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवालांना अंतरिम जामीन

दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात केजरीवालांना अंतरिम जामीन

 दिल्ली प्रतिनिधी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. आज सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील निर्णय दिला. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करताना, त्यांनी अद्याप सीबीआयच्या प्रकरणात तुरुंगातच राहावे लागणार आहे. ईडीकडून केजरीवाल यांना २१ मे रोजी अटक करण्यात आली होती. त्याआधी त्यांना नऊ वेळा समन्स बजावले होते, परंतु केजरीवाल चौकशीसाठी हजर झाले नव्हते. सीबीआयनेही काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांना अटक केली आहे.