अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार;एकास वीस वर्षाची शिक्षा
कोल्हापूर (प्रतिनिधी ) : एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एफ.सय्यदसो यांनी आरोपी आशिष अशोक जाधव (वय.31.रा वारे वसाहत,संभाजीनगर) याला 20 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड .आणि दंड न दिल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे .
अधिक माहिती अशी की ,यातील आरोपीने पीडीत मुलीवर नवीन वाशीनाका येथे असलेल्या कोल्ड्रींक हाऊस मधील असलेल्या कंपार्टमेंट मध्ये पीडीत मुलीवर वारंवार शारिरीक संबंध ठेवल्याने ती प्रेंगन्ट राहिली. ही गोष्ट पीडीत मुलीच्या आईच्या लक्षात आली .हा प्रकार फेब्रुवारी 19 ला घडला होता.पीडीत मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता संभाजीनगर परिसरातील वारेवसाहत येथे राहत असलेला आशिष अशोक जाधव यांच्याशी प्रेम संबंध असल्याचे सांगून त्याने जबरदस्तीने शरीर संबंध ठेवल्याचे सांगितले असता पीडीत मुलीच्या आईने आरोपीच्या विरोधात करवीर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
करवीर पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद करून त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश पी.एफ.सय्यदसो यांच्या कोर्टात चालून सरकारी वकील यांनी 14 साक्षीदार तपासून त्यांनी दिलेल्या साक्ष महत्वपूर्ण ठरुन कोर्टापुढ़े सादर केलेला सबळ पुरावा आणि सदरच्या गुन्हयात मुख्य फिर्यादीची ,पीडीत अल्पवयीन मुलीची साक्ष ,मेडीकल रिपोर्ट आणि डीएनए चा अहवाल व सरकारी वकील यांनी केलेला जोरदार युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य मानुन जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती.पी.एफ.सय्यदसो यांनी आरोपी आशिष अशोक जाधव यांला बाल लैंगिक कलम-6 कायद्यानुसार दोषी ठरवून 20 वर्षे कारावासाची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली.सदरची दंडाची रक्कम नुकसान भरपाई म्हणून पीडीतेला देण्याचा आदेश दिला.