दिवा विझताना जास्त फडफडतो;जयंत पाटलांची"यांच्यावर"टीका

दिवा विझताना जास्त फडफडतो;जयंत पाटलांची"यांच्यावर"टीका

मुंबई (प्रतिनिधी):  जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या मते, सरकारचे निर्णय हे मनमानी पद्धतीने घेतले जात आहेत. हिट अॅंड रन प्रकरणात २५ लाखांची मदत कमी करून १० लाख केली तर दुसरीकडे क्रिकेट खेळाडूंना ११ कोटी दिले गेले. त्यांनी सरकारच्या शेवटच्या काही दिवसांत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना म्हटले की, हे सरकार दिवा विझताना फडफडणाऱ्या दिव्यासारखे आहे आणि महायुती सरकारची अवस्था अशीच झाली आहे.

समृद्धी महामार्गावरील भेगांबाबतही त्यांनी सरकारवर टीका केली. समृद्धी महामार्ग, अटल सेतू, आणि कोस्टल रोड यांसारख्या प्रकल्पांवर अनावश्यक खर्च केला गेला असून, अपेक्षित खर्चाच्या तुलनेत जास्त पैसे खर्च करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या समृद्धीपेक्षा निर्णय घेणाऱ्यांची समृद्धी झाली आहे.पाटील यांनी सांगितले की, समृद्धी महामार्गावरच नाही तर इतर रस्त्यांवरही भेगा पडल्या आहेत. विरोधकांनी या गोष्टींची तथ्ये उघड करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.