दौलतराव निकम विद्यालयात दोन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर संपन्न

पत्रकार- सुभाष भोसले
व्हन्नूर ता.कागल येथील श्री.दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय व्हन्नूर या प्रशालेच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बंधुभाव,स्वावलंबन,शिस्त या शिकवणी बरोबरच त्यांच्या जीवनाला आकार व दिशा देऊन त्यांच्यात चांगले संस्कार घडावेत या उद्देशाने दोन दिवसीय निवासी स्काऊट गाईड शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरामध्ये इयत्ता पाचवी ते नववी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होत्या.यावेळी या शिबिरात ध्वजारोहन,तंबू सजावट स्पर्धा,बिना भांड्याचा स्वयंपाक स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम,निबंध लेखन स्पर्धा,रांगोळी स्पर्धा,शेकोटी कार्यक्रम,विविध गावातून पालक भेटी,परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांच्या भेटी या गोष्टींचा समावेश होता.
या शिबिरामध्ये विद्यार्थी घरापासून दोन दिवस लांब राहून स्वतःचा स्वयंपाक स्वतः करणे,स्वतःची कामे स्वतः करणे,बाजार करणे आणि निसर्ग सहवासात राहणे हा एक वेगळाच अनुभव मिळाल्याने त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
हे शिबिर संस्थाध्यक्षा श्रीमती सुनंदा निकम व मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांच्या प्रेरणेने आणि गाईड प्रमुख एम.जी.मोरे व स्काऊट प्रमुख बी.जी.बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. पालक वर्गातून देखील एक वेगळेच समाधान व प्रतिक्रिया येतअसल्याचे सोशल मीडियातून समजत आहे...