आरोपी दत्ता गाडेचा मोठा दावा, म्हणाला त्या मुलीसोबत माझे संबंध ....

आरोपी दत्ता गाडेचा मोठा दावा, म्हणाला त्या मुलीसोबत माझे संबंध ....

पुणे : पुण्यात स्वारगेट बसस्थानकावर तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणातील आरोपी दत्ता गाडेला पोलिसांनी आज मध्यरात्री अटक केलीय. त्याला दुपारी न्यायालयात हजर देखील केलं जाणार आहे. त्याअगोदर मात्र दत्ता गाडेने पोलिसांसमोर एक धक्कादायक दावा केलाय. त्यामुळे प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाल्याचं समोर येतंय. दत्ता गाडेच्या या दाव्यामुळे सगळीकडे मोठी खळबळ उडाली आहे.

अटक केल्यानंतर दत्ता गाडे याला लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलंय. तिथं आरोपीची कसून चौकशी केली जातेय. तर पोलीस कोठडीतच दत्ता गाडे याने टाहो फोडल्याची माहिती मिळते. माझं चुकलंय. मी पापी आहे, असं म्हणत दत्ता गाडे रडत असल्याचं समोर आलंय. मी तरूणीवर अत्याचार केलेला नाहीये. आमचे संबंध सहमतीने झाले, असा दावा देखील दत्ता गाडेने पोलिसांसमोर केलाय, असं सांगण्यात येत आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीने तरूणीवर बलात्कार केला नाही, तर संबंध संमतीने झाल्याची कबुली दिलीये . यामुळे आता या प्रकरणात नवीन ट्विस्ट येण्याची दाट शक्यता आहे. पीडीत तरूणी आणि आरोपी हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते का? हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जर दत्ता गाडे खरं बोलत असेल तर पिडीत तरूणी आरोपीवर असे खाेटे आरोप का करत आहे, हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.