ना. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा..!

कोल्हापूर - राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. कागल शहरात प्रभू श्री राम मंदिरात महाआरती करून रामनवमी साजरी करण्यात आली. त्याचबरोबर, जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळा, विविध देवतांची मंदिरे स्वच्छ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांतर्फे 3000 तासांचे श्रमदान करण्यात आले. तसेच 30 लाख रुपये खर्चाच्या साहित्याचे शाळांना वाटप करण्यात आले.
कागल शहरातील प्रमुख मार्गावर रंगीबेरंगी कमानी उभारण्यात आल्या होत्या. कमानीवर प्रभू श्रीराम आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचे लावण्यात आलेले डिजिटल फलक नागरिक, भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. कागलच्या प्रमुख मार्गावरून सकाळी स्वागत मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
खर्डेकर चौक येथील प्रभू श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच रामनवमीचा कार्यक्रमही झाला. मंदिरासमोर कागल शहरातील नगरपालिकेच्या सहा शाळांना अँड्रॉईड टीव्ही भेट देण्यात आल्या. इतर शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले. कागल तालुका खरेदी-विक्री संघाला घेण्यात आलेल्या आयशर ट्रकचे वितरणही करण्यात आले. प्रत्येक गावामध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केकचे वाटप झाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्तही राम मंदिर येथे केक कापण्यात आला. कागल येथील गणपतराव गाताडे मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन वाटप करण्यात आले. कागल येथील शाहू स्टेडियम येथे डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस आणि समर्थ कन्स्ट्रक्शन यांच्या वतीने शाहू वाचनालय येथे घेण्यात आलेल्या शिबिरात २७२ जणांनी रक्तदान केले. 'गोकुळ'चे संचालक, ज्येष्ठ नेते युवराज पाटील यांनी वाढदिवसानिमित्त राम मंदिर येथे भाविकांना तसेच नागरिकांना उसाच्या रसाचे वाटप झाले.
हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात येत असलेल्या पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेंतर्गत लस देण्यात आली. सायंकाळी गैबी चौकात आतषबाजी करण्यात आली. क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या संघांना बक्षीस वाटप करण्यात आले. गोसावी वसाहत येथे साखर वाटप करण्यात आली. अशा अनेक उपक्रमांनी ना. हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमांना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, ज्येष्ठ नेते युवराज पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक नवीद मुश्रीफ, श्रीनाथ उद्योग समूहाचे संस्थापक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, माजी नगराध्यक्ष अशोक जकाते, शहाणूर पकाली, असलम मुजावर, संजय ठाणेकर, हाजी मुनीर मुल्ला, प्रशांत हातगिने, आदी मान्यवर उपस्थित होते.