कासारी नदी पात्रात वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू

https://youtube.com/shorts/zguLAJBZzCM
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यातील कसबा ठाणे परिसरातील बंधाऱ्याजवळ असणाऱ्या कासारी नदी पात्रात वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसामुळं सध्या नद्यांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील कसबा-ठाणे बंधाऱ्याजवळील कासारी नदी पात्रात पाण्यासोबत वाहून गेल्याने दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. महाडिकवाडी येथील महादेव नरसिंग महाडिक हे आपले बैल धुण्यासाठी नदीवर गेले होते. दरम्यान दोन्ही बैल पाण्यासोबत वाहून गेले. या बैलांना नदी पात्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. बैलांच्या मृत्यूबद्दल महाडिक कुटुंबासह ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे.