पंतप्रधानांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने जल्लोषी स्वागत

पंतप्रधानांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने जल्लोषी स्वागत

कोल्हापूर - नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय बैठकीमध्ये जात निहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. गेल्या ७८ वर्षात जातीय जनगणनाच झाली नव्हती. भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर १९५१ साली प्रथमच जनगणना करण्यात आली पण जातनिहाय जनगणना करण्यात आली नाही तेव्हा पासून आज अखेर दर दहा वर्षांनी होणाऱ्या जनगणनेमध्ये जात निहाय जनगणना राजकीय भीतीपोटी विरोधी पक्षाकडून केली गेली नाही. आज हा ऐतिहासिक धाडशी निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने घेतला आहे. आज भारतीय जनता पार्टी कोल्हापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी साखर पेढे वाटून, भारत माता कि जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, नरेंद्र मोदी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत चौक दणाणून सोडला. 

यावेळी बोलताना जिल्हा सरचिटणीस डॉ राजवर्धन म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भाजपा कोल्हापूरच्या वतीने स्वागत करतो. विरोधी पक्षांचा जातनिहाय जनगणनेला कायम विरोध होता कारण जातनिहाय जनगणना केल्यामुळे समाज विभागला जाईल अशी राजकीय भीती त्यांना होती पण समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पर्यंत सुखसोयी, सुविधा, वैद्यकीय मदत व शैक्षणिक सुविधा पोहोचवण्यासाठी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पूर्णतः सामाजिक दृष्टीकोनातून  पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी घेतला आहे.

याचबरोबर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुंभार, मंडल अध्यक्ष विशाल शिराळकर, कोमल देसाई, स्वाती कदम यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाचे अभिनंदन करून आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू मोरे, आप्पा लाड, शैलेश पाटील, धनश्री तोडकर, माधुरी नकाते, गणेश देसाई, जिल्हा चिटणीस अमर साठे, विजयसिंह खाडे-पाटील, दिग्विजय कालेकर, संगीता खाडे, दिलीप मेत्राणी, विद्या बागडी, महेश यादव, संतोष माळी, गिरीष साळोखे, धीरज पाटील, रविकिरण गवळी, सुनील पाटील, राजगणेश पोळ, प्रीतम यादव आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.