पानिपतकार विश्वास पाटील यांची साहित्य अकादमीच्या एज्युकेटीव्ह कौन्सिलवर बिनविरोध निवड

सिंधुदुर्ग प्रतिनिधी-नारायण लोहार
नेर्ले ता.शाहूवाडी गावचे सुपुत्र,मराठी साहित्याचे मानबिंदू व पानिपतकार म्हणून लौकिक मिळवलेले जेष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची संपूर्ण भारतातील साहित्यिकांकडून साहित्य अकादमी दिल्लीच्या एज्युकेटीव्ह कौन्सिलवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे त्यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. विश्वास पाटील यांनी पानिपत,संभाजी,महानायक व महासम्राट या ऐतिहासिक कादंबरी लिहिल्या आहेत. तसेच पांगिरा ही सामाजिक कादंबरी लिहिली आहे.कलालचौक हा ग्रामीण जीवनावर आधारित कथासंग्रह लिहिलाआहे. झाडाझडती ही धरणग्रस्तांच्या व्यथा मांडणारी कादंबरी लिहिली आहे. महासम्राट ही काद॔बरी अनेक भाषेत भाषांतरीत झाली आहे. ऐतिहासिक कादंबरी लिहिण्यात त्यांचा हातखंडा आहे. ऐतिहासिक कादंबरी लिहिण्याताना विश्वास पाटील वास्तववादी लेखन करण्यास अधिक प्राधान्य देतात.त्यामुळे त्यांचे लेखन वाचकाला आकर्षित करते.महासम्राट ही काद॔बरी बुक डेपोत सहजासहजी मिळत नाही. कारण वाचक लगेचच बुक डेपोतून ही काद॔बरी खरेदी करतो.एवढी ही दर्जेदार कादंबरी आहे. साहित्य अकादमी दिल्लीच्या एज्युकेटीव्ह कौन्सिलवर विश्वास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल अनेक वाचकांनाही त्यांचे प्रत्येक्ष भेटून व फोनवरून अभिनंदन केले आहे. साहित्य अकादमी एज्युकेटीव्ह कौन्सिलवर बिनविरोध निवड होणे ही साधीसुधी बाब नाही. ही बिनविरोध निवड झाल्याने त्यांच्या आजपर्यंत लेखन साहित्यांचा गौरव केला आहे