बळीराजा इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा हॉलचे 17 मे रोजी भूमिपूजन

बळीराजा इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडा हॉलचे 17 मे रोजी भूमिपूजन

भुदरगड -  गंगापूर (ता. भुदरगड) येथील बळीराजा फाउंडेशन संचलित बळीराजा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथील क्रीडा हॉलचे भूमिपूजन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ, ज्येष्ठ नेते आबासाहेब देसाई यांच्या उपस्थितीत शनिवार १७ मे रोजी सकाळी १० वाजता होणार आहे.

यानंतर समर कॅम्प सांगता समारंभ व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार सकाळी ११ वाजता होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहकार्यातून व मंत्री दत्तामामा भरणे तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नांमुळे क्रीडा हॉल (बंदिस्त प्रेक्षागृह ) साठी निधी मंजूर झाला आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग समूहाचे संस्थापक - अध्यक्ष प्रकाशराव कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे 'केडीसीसी'चे संचालक प्रा. अर्जुन आबिटकर, प्रांताधिकारी हरीश सूळ, तहसीलदार डॉ. अर्चना पाटील, 'गोकुळ'चे संचालक नंदकुमार ढेंगे, तानाजी जाधव आदी उपस्थित राहतील. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर, पालक, शिक्षक व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन बळीराजा अॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव यांनी केले आहे.