HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

सकस आहाराबरोबर व्यायाम व खेळासाठी तरुणांनी मैदानावर उतरावे: समरजितसिंह घाटगे

सकस आहाराबरोबर व्यायाम व खेळासाठी तरुणांनी मैदानावर उतरावे: समरजितसिंह घाटगे

मुरगूड :  मोबाईलच्या मोठ्या प्रमाणातील वापरामुळे युवा पिढीचे व्यायाम व खेळाकडे दुर्लक्ष होत आहे.तंदुरुस्त आयुष्यासाठी व्यायाम व आहाराचे नियोजन अत्यावश्यक आहे.सकस आहाराबरोबर व्यायाम व खेळासाठी तरुणांनी मैदानावर उतरावे.असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन च्या मान्यतेने राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशनच्या वतीने राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित प्रकाशझोतातील निमंत्रितांच्या जिल्हास्तरीय हॉलीबॉल स्पर्धेच्या उद्घाटनवेळी ते बोलत होते. मुरगुड विद्यालयाच्या पटांगणावर सुरू असलेले या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित बारा संघानी सहभाग नोंदविला आहे. 

यावेळी शिवाजी विद्यापीठ इंटर झोनल स्पर्धेतील विजेत्या  सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाच्या संघातील खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कारही केला. यावेळी शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,बाजार समितीचे माजी सभापती कृष्णात पाटील,दत्तामामा खराडे,महादेव कानकेकर,अरुण व्हरांबळे,एकनाथ देशमुख,प्रताप पाटील,उत्तम पाटील,संजय चौगले ,महेश पाटील,दिगंबर अस्वले,पद्मसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अमर चौगले,विजय गोधडे,सुरेश गोधडे,राहूल खराडे,अजीत गोधडे विनोद निकम,सचिन गूरव,विशाल सणगर,विशाल सुतार,शशिकांत गोधडे,जयवंत पाटील ,सागर पाटील आदी नियोजन करीत आहेत. पंच म्हणून महेश शेडबाळे,प्रवीण मोरबाळे, दीपक चव्हाण,शहानवाज मोमीन, विनोद रणवरे काम पाहत आहेत. सुशांत मांगोरे यांनी स्वागत केले. अनिल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.विशाल भोपळे यांनी प्रास्तविक केले.

आठ संघ उपउपांत्य फेरीत दाखल 

प्रकाश झोतात दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आठ साखळी सामने झाले.राणाप्रताप,शिवराज विद्यालय व हॉलीबॉल असोसिएशन(सर्व मुरगूड ),श्री स्पोर्ट्स कुरुंदवाड,शिवाजी तालीम लिंगनूर,आदर्श स्पोर्ट्स निगवे,जी.डी. स्पोर्ट्स चंदगड व क्रीडा विकास फाउंडेशन कागल या संघानी विजय मिळवत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.