डॉ.कल्पना पाटील यांची प्रस्तावित वारणा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक पदी निवड

डॉ.कल्पना पाटील यांची प्रस्तावित वारणा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास संचालक पदी निवड

वारणा (प्रतिनिधि) : श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित महाराष्ट्र शासनाच्या समूह विद्यापीठ संकल्पनेच्या अंतर्गत होऊ घातलेल्या वारणा विद्यापीठाच्या (स्टेट पब्लिक युनिव्हर्सिटी) विद्यार्थी विकास, संचालक पदी आणि तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये प्रोफेसर इन फार्मसी म्हणून डॉ. कल्पना पाटील यांची निवड झाली.

डॉ. कल्पना पाटील यांना शैक्षणिक आणि प्रशासकीय सेवेत ३१ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचे पदवीचे शिक्षण ए.आर. कॉलेज ऑफ फार्मसी, सरदार पटेल युनिव्हर्सिटी, गुजरात येथून पूर्ण झाले. त्यांचे पुढील पदव्युत्तर शिक्षण केएलई चे कॉलेज ऑफ फार्मसी बेळगाव येथून झाले. तसेच त्यांनी पीएचडी ही डिग्री राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी भोपाळ येथून २००४ साली पूर्ण केली. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली चार विद्यार्थ्यांनी पीएचडीची पदवी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे.

त्यांनी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन रिसर्च बेळगाव कर्नाटक विद्यापीठामध्ये अकॅडमी कौन्सिल, बोर्ड ऑफ स्टडीज तसेच वेगवेगळ्या कमिट्यावरती अध्यक्ष व सदस्य म्हणून पदे भूषवली आहेत. त्या अधिष्ठाता, फार्मसी फॅकल्टी, केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, बेळगाव या पदावरही कार्यरत होत्या. संशोधनामध्ये त्यांचे विविध विषयावरील अनेक संशोधन पेपर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये प्रकाशित झालेले आहेत.

श्री वारणा विविध व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विनयरावजी कोरे यांनी अभिनंदन केले. यावेळी डॉ. व्ही. व्ही. कारजिन्नी, डीन, डॉ. एस. एम. पिसे, प्रभारी प्राचार्य, डॉ. डी. एन. माने, फार्मसी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. किरण पाटील, वारणा विद्यापीठाचे इतर संचालक व वारणा विभाग शिक्षण मंडळातील इतर संस्थांचे प्राचार्य व पदाधिकारी उपस्थित होते.