घाटगे फाउंडेशन वतीने परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन- नवोदिता घाटगे

घाटगे फाउंडेशन वतीने परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन- नवोदिता घाटगे

कागल (प्रतिनिधी) : कागलच्या "शाहू उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील आदर्श व अभ्यासू नेतृत्व स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृत महोत्सवी जयंती वर्षपूर्ती निमित्त राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन कागल यांचे मार्फत "परिवर्तन महावक्ता राज्य वक्तृत्व स्पर्धेचे" आयोजन केले आहे ,अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे,या स्पर्धा महाराष्ट्र राज्य मर्यादित असून इ 8 वी ते 12 वी व खुला गट अशा दोन गटात घेण्यात येणार आहेत. खुल्या गटासाठी विषय आहेत 1) सहकारातील दीपस्तंभ :स्व. विक्रमसिंह घाटगे 2) शाश्वत विकासाचा आश्वासक चेहरा: राजे समरजीतसिंह घाटगे 3) कागल काल आज आणि उद्या.4)कला, क्रीडा, संस्कृती चे आश्रय दाते :शाहू जनक घाटगे घराणे कागल 5)युवकांच्या आशेचा नवा किरण :राजे समरजितसिंह घाटगे.6) कागल ची खरी ओळख: राजकीय विद्यापीठ की राजर्षी शाहूंची भूमी.

या गटातील प्रथम क्रमांकासाठी रोख रुपये 15 हजार, द्वितीय क्रमांकासाठी रुपये 11 हजार तृतीय क्रमांकासाठी रुपये 7 हजार व उत्तेजनार्थ रुपये 1000 ची (पाच बक्षीसे)  इ 8 वी 12 या गटासाठी विषय आहेत 1) राजे समरजीतसिंह घाटगे :पाणीदार नेतृत्व. 2) राजर्षी शाहू महाराजांचे कृतिशील वारसदार : स्व. राजे विक्रम सिंह घाटगे 3)शैक्षणिक कार्याचा समर्थ वारसा :राजर्षी शाहू महाराज ते राजे समरजितसिंह घाटगे 4) वक्तृत्व, कर्तृत्व, आणि नेतृत्वाचा मानदंड.: स्व. राजे विक्रमसिंह घाटगे 5) मला भावलेले सुसंस्कृत नेतृत्व: राजे समरजितसिंह घाटगे.

या गटासाठी पहिले बक्षीस रुपये 10 हजार, दुसरे बक्षीस रुपये 7 हजार तिसरे बक्षीस रू 5 हजार, आणि उत्तेजनार्थ प्रत्येकी रुपये 1000 ची पाच बक्षीसे. प्रत्येक विजेत्यास सन्मानपत्र व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या स्पर्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर होत असून आठवी ते बारावी साठी 5+2 =7 मिनिटे व खुल्या गटासाठी 7+2=9 मिनिटे अशी वेळ आहे.कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क नाही

तरी स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी आपल्या भाषणाचा व्हिडिओ 20ऑगस्ट 2024 अखेरपर्यंत 7709740621 या फोन नंबरवर डॉक्युमेंट फाईल ने पाठवून द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9579338813 या फोनवर संपर्क साधावा.