सर्वशास्त्रीय सोनार संस्थेमार्फत हस्तकला कारगीर कार्ड मेळावा

सर्वशास्त्रीय सोनार संस्थेमार्फत हस्तकला कारगीर कार्ड मेळावा

कोल्हापूर (प्रतिनिधि) : सोनार एकता फौंडेशन यांच्यामार्फत सर्वशास्त्रीय सोनार संस्थेमार्फत पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच आर्टीसन कार्ड, पंतप्रधान विश्वकर्मा योजना ((MEGP and MEGP) या कर्ज योजनांचे सर्वसामान्य सोनार समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. याचे आयोजन शनिवार दि. २० जुलै रोजी कऱण्यात आले आहे. आर्टीसन कार्ड म्हणजे काय? याबाबत जनजागृती करणे, या मेळाव्याचा महत्वाचा उद्देश आहे. आर्टीसन कार्ड या कारागीरांना मोफत मिळवून देण्यासाठी केंद्रसरकारच्या हस्तकला मंत्रालयाचे हस्तकला आयुक्त चंद्रशेखर सिंग या मेळाव्याला मार्गशर्दन करणार आहेत.

आर्टीसन कार्ड हे सर्व क्षेत्रातील हस्तकला कारागीरांसाठी केंद्र सरकार मार्फत देण्यात येते. 

आर्टीसन कार्डचे फायदे व यासाठी कोण पात्र आहेत

पात्रता : १) हस्तकला काम करणाऱ्या सर्व वर्गातील वय वर्षे १८ ते ८०, महिला व पुरुष २) ज्यांचे आधार कार्ड बँक अकाऊंटला लिंक आवश्यक

फायदे : १) पंत्रप्रधान मुद्रा कर्ज योजने अतंर्गत व्याज दर कमी

२) सरकारच्या विमा योजना व पेंशन योजनेसाठी पात्र

३) इयत्ता ९ वी ते १२ मधील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लाभ

४) हस्तकला प्रशिक्षण मोफत दिले जाते.

५) उत्कृष्ठ कारागीरांसाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र (हा पुरस्कार देशाचे राष्ट्रपती प्रदान करतात)

६) हस्तकला कारागीर आपल्या उत्पाद‌नांचे राष्ट्रीय एक्झिबीशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतासाठी बाजारपेठ उपलब्ध करू शकतात.

याचे आयोजन दैवज्ञ भवन, दुधाळी मैदान, एम.एस.इ.बी. ऑफीस समोर करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी भारतीय स्वर्णकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दुलीचंद कडेल (जयपुर, राजस्थान) व त्यांची सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत.

सोनार एकता फौंडेशन अध्यक्ष अनिल पोतदार (हुपरीकर), उपाध्यक्ष अनिष पोतदार, सचिव नचिकेत भुर्के, खजानिस रामदास रेवणकर, संचालक मिनेष पोतदार, राजकुमार धर्माधिकारी हे या प्रेस कॉन्फरंससाठी उपस्थित होते.