भगवान महावीर अध्यासनासाठी वसंतराव चौगुले ट्रस्टकडून एक लाख

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या नूतन इमारतीकरिता येथील श्री वसंतराव चौगुले ट्रस्टच्या वतीने एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश काल (दि. २५) कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषआण्णा चौगुले, उपाध्यक्ष अनिल चौगुले, सचिव अनिल पाटील (संचालक, केडीसीसी बँक) यांच्या हस्ते हा धनादेश कुलगुरूंकडे देण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अध्यासनाच्या सल्लागार समितीचे सदस्य सुरेंद्र जैन, एन. एन. पाटील, डॉ. मनोज पाटील, डी. ए. पाटील, ट्रस्टचे संचालक नितीन चौगुले, लक्ष्मीकांत चौगुले, सुमीत चौगुले आदी उपस्थित होते.