प्रमोद श्रीधर सावंत यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

प्रमोद श्रीधर सावंत यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी : नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या माध्यमिक विद्यालयात प्रमोद श्रीधर सावंत, लिपीक हे नियत वयोमानानुसार 31 डिसेंबर 2024 रोजी सेवानिवृत्त झाले.

प्रमोद सावंत यांच्या नोकरीची सुरुवात नरडवे इंग्लिश स्कूल नरडवे या हायस्कूलमध्ये झाली. काही वर्षानंतर त्यांचे समायोजन होऊन ते न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या विद्यालयात रुजू झाले. त्यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार व शुभेच्छा कार्यक्रम 8 फेब्रुवारी 2025 रोजी नरडवे हायस्कूल नरडवे येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जगनाथ यशवंत सावंत, (अध्यक्ष, अखिल नरडवे ग्रामोद्वार संघ मुंबई) यांनी भूषविले. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रदीप जनार्दन ढवळ (आनंद विश्व गुरुकुल विद्यालय संस्थापक अध्यक्ष, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे विद्यमान सभासद) आणि विद्यालयाचे आजी माझी मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

 प्रमुख पाहुणे प्रदीप ढवळ यांनी सत्कारमूर्ती प्रमोद सावंत यांच्या नरडवे हायस्कूल मधील कार्याविषयी कौतुक केले. त्यांचे सुंदर हस्ताक्षर, कामातील नीटनेटकेपणा व वक्तशीरपणा याचबरोबर सयमी व शांतपणे मग्न होऊन काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रमोद सावंत होय असे गौरवोद्गार काढले.

तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जगनाथ सावंत यांनीही प्रमोद सावंत यांच्या कार्याच्या आठवणी विशद केल्या.नरडवे हायस्कूलचे मुख्याध्यापक यांनीही प्रमोद सावंत यांचे नरवडे व न्यू इंग्लिश स्कूल हळदीचे नेरुर या विद्यालयातही त्यांचे काम कसे नाविन्यपूर्ण होते हे नमूद केले.

 सत्कारमूर्ती प्रमोद सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.आपल्या जन्मभूमित सत्कार झाल्याने समाधान व्यक्त केले.नरडवे हायस्कूल व मान्यवरांचे सत्कार केल्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाच्याशेवटी सर्व मान्यवर, प्रमुख पाहुणे प्रदीप ढवळ, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष जगनाथ सावंत व उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता झाली.