HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

रिपब्लिकन पक्षातर्फे ५ मे रोजी भारत झिंदाबाद यात्रेचा समारोप कोल्हापूरात होणार - सतीश माळगे

रिपब्लिकन पक्षातर्फे ५ मे रोजी भारत झिंदाबाद यात्रेचा समारोप कोल्हापूरात होणार - सतीश माळगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जम्मु काश्मीर मधील पहलगाम येथे निरापराध भारतीय पर्यटकांवर हल्ला करुन २८ निष्पाप भारतीयांची क्रूर हत्या केली या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने "ऑपरेशन सिंदूर” केले व पाकव्यात काश्मीर मधिल दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करून १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना ठार केले. भारतीय सैन्याने अतुलनीय शौर्य दाखवून देशाचे संरक्षण केले, देशाचे पंतप्रधान यांनी जाहीर केल्याप्रमाणे नेमकी ठिकाणे हेरुन दहशतवादी तळ उध्वस्त करुन पाकिस्तानला जेरीस आणले. या याशाबद्दल आणि धैर्य वाढवण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी देशभर “भारत झिंदाबाद यात्रा" २८ मे ते ६ अखेर आयोजित केली आहे. या यात्रेचा समारोप गुरूवात ५ जून रोजी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून शहरभर फिरवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जोतीबा फुले यांच्या बिंदु चौकातील पुतळ्यांना अभिवादन करुन कोल्हापूर येथे समारोप सभेने होणार असल्याची माहिती समारोप यात्रेचे संयोजक सतीश माळगे यांनी दिली.

समारोप सभेचे व यात्रेचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे व महाराष्ट्र राज्य सह सचिव बी. के. कांबळे करणार आहेत, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा सचिव व समारोप यात्रेचे संयोजक सतीश माळगे यांनी सांगितले. 

सर्व नागरिकांनी गुरुवारी ५ जून रोजी सकाळी ११ वाजता दसरा चौक कोल्हापूर येथे सहभागी व्हावे असे अवाहन प. महाराष्ट्र उपाध्यक्ष कुमार कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष दिपक, भोसले जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे सर, शहर अध्यक्ष सुखदेव बुष्याळकर, कुंडलिक ऊर्फ बटु भामटेकर यांनी केले आहे.

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.