सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’ शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’ शी ऋणानुबंध कायम ठेवावा - नविद मुश्रीफ

कोल्हापूर (प्रतिनिधी) - कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा. संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघ सेवेतून सेवानिवृत्त झालेबद्दल ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ यांच्या हस्‍ते संघाच्‍या प्रधान कार्यालय, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी दुग्ध व्यवसायातून ‘गोकुळ’ शी ऋणानुबंध कायम ठेवावा असे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी यावेळी केले. 

गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ पुढे म्हणाले, गोकुळच्या प्रगतीसाठी कर्मचारी यांनी आपल्या संघ सेवेतून मोलाचे योगदान दिलं आहे. आपल्या अनुभवातून वेळोवेळी संघाचे नुकसान टाळले आणि कठीण प्रसंगी योग्य दिशा दाखवली. त्यांची शिस्त, सचोटी आणि संघाशी असलेली नाळ ही सध्याच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. सेवानिवृत्तीनंतरही गोकुळशी असलेलं नातं तुटत नाही, उलट ते अधिक भावनिक आणि बंधुत्वाचं होतं. त्यामुळे सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या गावात, कुटुंबात किंवा वैयक्तिक पातळीवर दुग्ध व्यवसायाशी नातं टिकवून ठेवावं. गोकुळशी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून संपर्कात राहणं ही केवळ निष्ठा नव्हे, तर संस्थेच्या वाटचालीत आपलं योगदान सतत जपण्याचा एक मार्ग आहे.

यावेळी कुस्तीपटू प्रथमेश सुर्यकांत पाटील, रा. बानगे ता. कागल किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवल्याबद्दल तसेच हर्षवर्धन अजित माळी, रा. म्हाकवे ता. कागल यांनी नागपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक व किर्गीस्थान येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत निवड झालेबद्दल त्यांचा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

या सेवानिवृत्‍त कर्मचा-यांमध्‍ये माणिक डवरी, सर्जेराव पाटील, रामचंद्र चव्हाण, कोंडीबा पाटील, रंगराव चौगुले, रघुनाथ चौगुले, आनंदा स्वामी, सातापा पारळे, आकाराम पाटील, संभाजी पाटील, सुखदेव सुळकुडे, राजाराम पाटील, चंद्रशेखर घाळी, गजानन मुचंडी, जयवंत पाटील, भागोजी दळवी, अशोक परीट, बाजीराव कणसे त्याचबरोबर इतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना श्रीफळ, गोकुळचे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील - चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी तसेच सेवानिवृत्‍त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.