मंत्री धनंजय मुंडेंची सावली समजले जाणारे वाल्मिक कराड आहेत तरी कोण ?

मंत्री धनंजय मुंडेंची सावली समजले जाणारे वाल्मिक कराड आहेत तरी कोण ?

बीड : केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख  हत्या प्रकरण सर्व देशभरात गाजत आहे. संतोष देशमुख यांना अत्यंत क्रूर पद्धतीने आणि हाल हाल करून आरोपींनी संपवलं. अजूनही या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील मास्टरमाईंड कोण याचा तपास पोलीसांकडून सुरु आहे. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. विरोधकांकडून या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या वाल्मिक कराड यांचे नाव घेतले जात आहे. मात्र हे वाल्मिक कराड आहेत तरी कोण? असा प्रश्न लोकांना पडला आहे.

गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा ते धनंजय मुंडेंची सावली

वाल्मिक कराड हे वाल्मिक अण्णा म्हणून बीड तालुक्यामध्ये ओळखले जातात. मात्र वाल्मिक कराड यांचा वाल्मिक अण्णापर्यंतचा प्रवास महत्त्वाचा आहे. कारण या प्रवासामध्ये त्यांनी असं काय केलं की, 'त्यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही', हे विधान स्वत: पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. भाजप आमदार सुरेश धसही जाहीरपणे बोलले आहेत. गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती. वाल्मिक कराड हे गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत असल्याचं म्हटलं जातं. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते, जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेसोबत आले. त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी वाल्मिक कराड पार पाडत होते.

वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माझी गटनेते आहेत नाथं प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य अथवा अध्यक्ष जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मंत्री धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात गेल्या दहा वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे.एकप्रकारे वाल्मिक कराड हे मंत्री  धनंजय मुंडेंची सावलीच समजले जातात.