विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाची आढावा बैठक संपन्न

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युवासेनाची  आढावा बैठक संपन्न

 कोल्हापूर (प्रतिनिधी) : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवा सेना सचिव वरून देसाई यांच्या आदेशाने आज कोल्हापूर युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष यांच्यावतीने विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर करवीर या तिन्ही विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.

 या बैठकीला युवा सेना विस्तारक कोल्हापूर विशाल विचारे हे प्रमुख मार्गदर्शक होते.  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपले मतदार वाढवले पाहिजेत, वेळप्रसंगी 288 ठिकाणी उमेदवार दिले तर तेही जिंकले पाहिजेत. अशी अपेक्षा विचारे यांनी यावेळी व्यक्त केली.  

 यावेळी युवा सेना जिल्हाप्रमुख मंजित माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी युवासेना जिल्हा चिटणीस युवराज मोरे, उपजिल्हाप्रमुख शेता सुतार, उपजिल्हाप्रमुख पवन तोरस्कर, शहरी युवा अधिकारी योगेंद्र माने, चैतन्य देशपांडे बंडा लोंढे रघु भावे अक्षय घाडगे, तालुका समन्वयक रमेश पाटील, उपजिल्हाप्रमुख सुनील चौगुले, सचिन नागटिळक, योगेश लोहार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .