महापालिकेच्या वतीने 59 सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी पुर्ण

महापालिकेच्या वतीने 59 सफाई कर्मचाऱ्यांची वैद्यकिय तपासणी पुर्ण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री प्रशासकिय गतिमानता अभियान व 100 दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत आरोग्य विभागाच्या 59 सफाई कर्मचाऱ्यांची आज चौथ्या व अंतीम टप्प्यात वैद्यकिय तपासणी करण्यात आली. आजअखरे या वैद्यकिय तपासणी शिबीरामध्ये 239 सफाई कर्मचाऱ्यांची तपासणी पुर्ण करण्यात आली आहे. हि तपासणी सावित्रीबाई फुले रुग्णालयात प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांच्या मागदर्शनाखाली करण्यात आली.

या तपासणीमध्ये रक्त, लघवी तपासणी, मोतीबिंदू व डोळयांचे आजार, मणक्याचे व हाडांचे आजार, शुगर-बिपी यासारख्या तपासण्या करण्यात आलेल्या आहेत. तसेच संबधित कर्मचाऱ्यांना गरजेनुसार कॅल्शियम, फॉलिक ॲसिड यासारखे औषध उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापुढेही कायम आस्थापनेवरील सर्व सफाई कर्मचाऱ्यांची दर तीन महिन्यातून एकदा वैद्यकिय तपासणी करण्यात येणार आहे.

या शिबीरासाठी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, नोडल ऑफिसर डॉ.अमोलकुमार माने, प्रशासकिय वैद्यकिय अधिकारी डॉ.संजना बागडी व सावित्रीबाई फुले रूग्णालयाकडील वैद्यकिय स्टाफ उपस्थित होता.