कागलच्या श्रीराम मदिंरमध्ये अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्षपुर्ती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

कागलच्या श्रीराम मदिंरमध्ये अयोध्येतील प्रभु श्री रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्षपुर्ती निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात

कागल (प्रतिनिधी) : अयोध्यानगरीतील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये श्री. रामलल्ला प्राण प्रतिष्ठापनेच्या वर्षपुर्ती निमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी मंदिरमध्ये दिवसभर गर्दी केली होती.

राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा  नवोदिता घाटगे, विश्वजीतसिंह घाटगे व त्यांच्या पत्नी राजलक्ष्मीदेवी घाटगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.

   सकाळी सात वाजता श्रींना विधीवत अभिषेक घालण्यात आला.सकाळी दहा ते दुपारी बारा या दरम्यान श्री रामरक्षा पठण,श्री हनुमान स्तोत्र व श्री रामनामाचा जप असे धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम झाले. दुपारी बारा वाजता महाआरतीनंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. प्रभू श्रीरामांच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला. मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोशणाई केली होती.

   यावेळी श्री रामलल्लांच्या दर्शनासाठी सकाळपासूनच शहरासह परिसरातील अबालवृद्ध,माता भगिनी,भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्रीराम मंदिर जिर्णोध्दार समितीच्यावतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.