महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी: 7 जण गेले वाहून , अजून 3 बेपत्ता

महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी: 7 जण गेले वाहून , अजून 3 बेपत्ता

कोल्हापूर (प्रतिनिधि) : जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथे बस्तवाड वाहतूक मार्गावर ट्रॅक्टर ट्रॉली महापुराच्या पाण्यात पलटी झाली. या दुर्घटनेत 7 जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत, त्यातल्या 4 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, तर 3 जणांचा अद्याप शोध सुरू आहे.

ट्रॅक्टर ट्रॉलीत सात जण होते, जे ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठ्यासाठी आणि केळीच्या शेतात कामासाठी जात होते. पाण्याच्या वाढीव प्रवाहामुळे ट्रॉलीचा चालक ताबा गमावून बसला, परिणामी ट्रॉली पलटी झाली. घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले असून शोध मोहीम चालू आहे.