लिटल हार्ट स्कूल मध्ये स्वतंत्र्य दिन उत्साहात साजरा

लिटल हार्ट स्कूल मध्ये स्वतंत्र्य  दिन उत्साहात साजरा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लिटल हार्ट इंग्लिश मीडियम स्कूल गाडगीळ कॉलनी शांतीनगर पाचगाव व बळवंत नगर कोल्हापूर या ठिकाणी 78 वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रथम विद्यार्थ्यांची परेड व संचलन करून भारत मातेच्या वीर जवानांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी स्कूल तर्फे ध्वजारोहण साठी वीर जवानांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी भारत मातेच्या सेवेमध्ये रुजू असलेले मेजर संग्राम शिवाजी बोडके (द. वडगाव ),माजी सैनिक कॅप्टन शिवाजी हरी रुमाले ,सुभेदार शिवाजी हरिबा भोळे, मेजर बाबासाहेब लोंढे (पाचगाव) मेजर धनंजय साताप्पा वाडकर (दिंडनेरली) व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री भगवान साताप्पा कोईगडे (दिंडनेरली ) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीत ध्वजगीत व समूहगीत विद्यार्थ्यांनी सादर केले .

यानंतर वीर जवानांचा सत्कार समारंभ व वीर जवानांचे रोमांचकारी अनुभव व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच विद्यार्थ्यांची भाषणे व बेस्ट स्टुडंट ,बेस्ट टीचर अवॉर्ड वितरण सोहळा व स्कूल तर्फे नेहमीच शैक्षणिक सामाजिक क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पाठबळ व प्रोत्साहित करण्याचे काम केले जाते यावेळीही पाचगावाची पैलवान ऋतुजा संतोष गुरव हिची थायलंड येथे झालेल्या इंटरनॅशनल U15 - U20 एशियन चॅम्पियनशिप मध्ये सिल्वर मेडल व कुमारी पैलवान श्रुतिका शिवाजी पाटील हिची उत्तराखंड येथे पार पडलेल्या स्पर्धेमध्ये कास्यपदक व पुढील निवड जॉर्डन येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी झाली आहे त्या दोघींचा सत्कार करण्यात आला. यानंतर प्रिन्सिपल अमृता पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा अमृता पाटील, उपाध्यक्ष अवंती जगताप, सेक्रेटरी राजनंदिनी मोरबाळे, संस्थेचे सदस्य अभिजीत पाटील ,अमित जगताप ,सचिन मोरबाळे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व पालक यांची उपस्थिती होती.