सिद्धार्थ जाधवची पत्नीही पर्यटन व्यवसायात

सिद्धार्थ जाधवची पत्नीही पर्यटन व्यवसायात

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ जाधव एक धडाकेबाज कलाकार आहे. सिद्धार्थ जसा प्रयोगशील कलाकार आहे तशीच त्याची पत्नी तृप्ती जाधवही नवीन काहींना काही नेहमीच करत असते. नुकताच तृप्ती जाधव हिने अलिबाग येथील नागावमध्ये होम स्टे सुरू केलाय. या होम स्टेला तिने तृप्ती कॉटेज असे नाव दिले आहे. या कोटेजमध्ये पर्यटक राहू शकतात. तृप्ती कॉटेज हि थ्री बीएचकेची  सदनिका आहे.  या सदनिकेला स्वतः तृप्तीने सुंदर सजवल आहे.

सिद्धार्थने पत्नीला तिच्या नवीन व्यवसायासाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत. तृप्तीचा व्हिडिओ आपल्या इन्स्टा पोस्टवर शेअर करत त्यांनी लिहिले की अभिनंदन तृप्ती... आज तुझं स्वप्न पूर्ण झालंय. तुझं स्वप्न सत्यात उतरलं यासाठी मी खूप आनंदी आहे. गॉड ब्लेस यु. सिद्धार्थ जाधव म्हणतो, 'बायको खूश तर आपण खूश'

तृप्ती जाधव नेहमीच नवनवीन करत असते. तृप्ती जाधवनी यापूर्वीही तिच्या मुली स्वरा आणि इरा या दोघींचं नाव एकत्र करून स्वइरा या नावाने कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला होता. आणि आता नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिने होम स्टे सुरू करून आणखी एका व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे