मुडेंचा राजीनामा झाला, आता कोकाटेंचा नंबर : अंबादास दानवे

मुडेंचा राजीनामा झाला, आता कोकाटेंचा नंबर : अंबादास दानवे

मुंबई : धनंजय मुंडे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविला आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत.  

आता यावर ठाकरे गटाचे नेते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या 'X' अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलय की, धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मुंडेंचा राजीनामा झाला, आता कोकाटे यांचा नंबर! अशा आशयाची पोस्ट दानवे यांनी केली आहे.