HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.

मुरगुड येथील महाविकास आघाडीच्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद

मुरगुड येथील महाविकास आघाडीच्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद

  देशाचे नेते शरद पवार,समरजितसिंह राजेंच्या विजयांच्या घोषणांनी आसमंत दुमदुमला

   कागल प्रतिनिधी  :  मुरगुड येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजे समरजितसिंह घाटगे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेस उदंड प्रतिसाद मिळाला.पदयात्रेचा प्रारंभ राजे समरजितसिंह घाटगे यांच्या उपस्थितीत येथील ग्रामदैवत अंबाबाई मंदिरात जाऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन करण्यात आला.

         दरम्यान दिवंगत खास.सदाशिवराव मंडलिक आणि हुतात्मा स्मारकास भेट देऊन राजे समरजितसिंह घाटगे यांनी नतमस्तक होत अभिवादन केले.

    या पदयात्रेच्या दरम्यान देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार,राजे समरजितसिंह घाटगे आणि महाविकास आघाडीच्या विजयांच्या घोषणांनी एकच आसमंत दुमदुमून गेला होता... यावेळी मुख्य बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या पदयात्रेस नागरिकांनी दिलेला प्रतिसाद हा उत्साह वाढवणारा तर होताच शिवाय जणूकांही या परिवर्तनाची साक्ष देणाराच होता...

                  यावेळी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील,विश्वजीत पाटील, अनंत फर्नांडिस, विलास गुरव, दगडू शेणवी, विजय राजिगरे, सुरेश गोधडे, दत्तामामा खराडे, प्रवीण चौगुले, अमर चौगुले ,दत्तामामा जाधव, डॉ. अशोकराव खंडागळे, बजरंग सोनुले यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्वच सहयोगी पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,कर्मचारी,तरुण वर्ग, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       मुरगुडकर नागरिकांचा मिळालेल्या अफाट प्रतिसादाने या पदयात्रेचा शेवट येथील मुरगुड नाका येथे करण्यात आले.

 

UA-251692938-1 HACKED BY Z-SH4DOWSPEECH

HACKED BY Z-SH4DOWSPEECH

Z-BLACK-HAT-TEAM
Nikmati masa mudamu dengan aksi, bukan sakit hati.