धनंजय मुंडेच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टचं बोलले, म्हणाले.....

धनंजय मुंडेच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टचं बोलले, म्हणाले.....

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने दिल्ली दौऱ्यावर आहेत. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर विरोधकांकडून गंभीर आरोप केले जात आहेत. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला जातोय. मंत्री धनंजय मुंडेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. पत्रकारांनी धनंजय मुंडे यांनी भेट घेतली का असं विचारल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यावेळी स्पष्टचं बोलले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

धनंजय मुंडे हे त्यांच्या कामासाठी आले होते. मी माझ्या कामासाठी आलो होतो. त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती. कारण आम्ही त्याआधी देखील मंत्रिमंडळ बैठकीत भेटलो होतो. धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधीही भेटू शकतात. मी त्यांना कधीही भेटू शकतो. कुठल्याही कामासाठी भेटू शकतो", अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. "धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजित दादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे", असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.