मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याचा - खास. धनंजय महाडिक
कोल्हापूर प्रतिनिधी:आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत या संकल्पनेला वेगाने मुर्तस्वरूप देण्यासाठी आजचा केंद्रीय अर्थसंकल्प महत्वाचा आहे. शेतकरी, महिला, नोकरदार, युवक, उद्योजक आणि गोरगरीबांच्या अपेक्षांचा आणि गरजांचा विचार करून, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी हा परिपूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पायाभूत सुविधांसाठी ११ लाख कोटी रूपयांची तरतुद म्हणजे देशाच्या विकासाचा भक्कम पाया आहे. तर शेतकर्यांनाही या अर्थसंकल्पातून मोठा दिलासा मिळाला आहे. रोजगार, कौशल्य विकास, शिक्षण, शहरीविकास, गरीबांसाठी घरकुल, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्यांक मागास घटकांचा विकास अशा सर्व मुद्दयांचा समावेश असलेला मोदी सरकारचा हा अर्थसंकल्प देशाला महासत्ता बनवण्याच्या वाटेवर नेणारा आहे. असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले.