सूरज चव्हाणची ‘झापुक झुपूक’ करत मोठ्या पडद्यावर एंट्री ; रितेश देशमुख म्हणाला केदार शिंदे यांनी आधीच...

मुंबई: बिग बॉस मराठीच्या एन्ट्रीवेळी सूरज चव्हाणवर झालेली टीका काहीच दिवसात त्यांच्या कौतुकात बदलली. त्याचं माणूसपण प्रेक्षकांना भावलं आणि लोकप्रिय कलाकरांना मागे सारत त्यानं बिग बॉस मराठीचं विजेतेपद जिंकलं. आता तर तो ‘झापुक झुपूक’ करत थेट मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतोय. त्याच्या ‘झापुक झुपूक’ सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सूरज चव्हाणला ब्रेक दिलाय.
रितेश देशमुखच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च
बॉलिवूड स्टार रितेश देशमुखच्या हस्ते हा ट्रेलर लॉन्च करण्यात आला. या सोहळ्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ट्रेलरबद्दल बोलायचं झालं तर विशेष म्हणजे तरुणांमध्ये या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळतेय. सूरज चव्हाणची स्टाईल आणि धमकेदार डायलॉग्स यामुळं टीझर यापूर्वीच चर्चेत आला आहे. आता ट्रेलरही व्हायरल होतोय. सिनेमात सूरजची हिरोईन असणार आहे जुई भागवत. दोघांची हटके जोडी चर्चेचा विषय ठरतेय.
सूरज चव्हाणवर सिनेमा करायचं तेंव्हाच ठरवलं होतं
रितेश देशमुखच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. विशेष म्हणजे रितेशनेच 'बिग बॉस' चा हा सीजन होस्ट केला होता. यावेळी तो म्हणाला की, बिग बॉसची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा माझा आणि सूरजसाठी तो पहिला प्रवास होता. केदार भाऊंसाठी सुद्धा तो पहिला प्रवास होता. सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरात तिसऱ्या आठवड्यात होता तेव्हाच केदार भाऊंनी सूरजवर सिनेमा बनवण्याचं ठरवलं होतं. त्यांनी त्यावेळी मला म्हटलं होतं की विजेता कोण पण असू दे मी सूरजवर चित्रपट बनवणार आणि ह्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे. असं नाही आहे कि सूरज जिंकल्यावर सिनेमा बनवण्यात आलाय. त्यामुळे केदार भाऊंच्या हिम्मत आणि कंमिटमेंटला माझा सलाम आहे.
'या' दिवशी भेटीला येतोय ‘झापुक झुपूक’?
हा सिनेमा येत्या जोडी २५ एप्रिल २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बिग बॉस मराठीच्या अंतिम फेरीतच सूरज सोबत एक चित्रपट करणार असल्याचं सांगितलं होतं. आता काहीच महिन्यात त्यांनी सूरजचं हे स्वप्न पूर्ण केलंय.