लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

मुंबई : मराठी आणि हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते योगेश महाजन यांचं वयाच्या ५० व्या वर्षी गुजरातमधील उमराव येथे निधन झालं आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचा मुत्यू झाला.
योगेश‘शिव शक्ती-तप, त्याग, तांडव’ या हिंदी मालिकेच्या शूटिंगसाठी योगेश महाजन उमरगावमध्ये होते. या मालिकेमध्ये त्यांनी शुक्राचार्यांची भूमिका साकारली होती. योगेश यांना शनिवारी संध्याकाळी शूटिंगची शिफ्ट संपताना तब्येत बिघडली असल्याचं जाणवलं. त्यामुळे ते डॉक्टरांकडे गेले, तपासणी केली. रात्री हॉटेलमध्ये येऊन झोपले. रविवारी सकाळी ते शूटिंगसाठी सेटवर पोहोचले नाहीत त्यामुळे मालिकेच्या टीमने त्यांना बरेच फोन केले. पण त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. शेवटी टीमने हॉटेलच्या रूमचा दरवाजा तोडून आत गेल्यावर ते बेडरूममध्ये खाली पडलेल्या अवस्थेत आढळले. मात्र, योगेश यांनी आधीच प्राण सोडला होता.